एस टी अगार.

मला भटकायला खुप आवडते आणि त्यासाठी मी शक्यतो एस टीचा वापर करतो आणि सर्वानी ही नक्कीच करावा. एस टी कात टाकत आहे. नविन नविन बसेसची खरेदी केली जात आहे. तसेच वातानुकुलितही सेवा सुरु केली गेलेली आहे. महत्वाचे म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी अथक प्रयत्न केले जात आहे, त्याचे एस टी महामंडळाला फायदा ही होत आहे. नेहमीच तोट्यात जाणारी एस टी आज नफ्यात आहे. याचे सर्व श्रेय एस टी महामंडळ आणि प्रवाशाना जाते. परंतु यात एक कमतरता जाणवते ती आगराची, स्वच्तेचा अभाव, घाणिचे साम्राज्य, दुर्गंदीयुक्त प्रसाधनगृह आणि सर्वात महत्वाचे ते उपहारगृहची दैनावस्था, खाण्याचे पदार्थ निकृष्ट दर्जाचे परंतु भाव जास्त, उघड्यावर केलेली मांडणी तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अहो चक्क बिस्लेरीच्या बाटली मध्ये बोरिंगचे पाणी, कस सहन करणार प्रवासी आणि किती दिवस प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आगारात चाललेला ह्या गैर प्रकाराला आगारप्रमुखाने वेळेतच आळा घातला पाहिजे, नाहीतर प्रवाशांचा उद्रेकाची पहिली झळ त्यानांच सोसवी लागेल आणि एस टीचा नफा ही कमी होत जाइल. एस टी महामंडळाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी हीच इच्छा.


गणेश थोरात

मिठी

शिरता शिरता मिठीत तुझिया,
भासे मजला स्वर्ग गवसला
विसरूनी सारे दुःख वेदना,
हृदयी अवचित सूर उमटला

स्पर्शसुखाचा फुलता मोहर,
रोमरोम रसरसले सत्वर
विसावता या कुशीत तुझिया,
एक अनामिक उठली हुरहुर

थांबला आता श्वासही माझा,
थांबली ती ह्रुदयाची धडधड
मिटून जाता दरी सहज ही
निमून गेली माझी तडफड

एकच आता ध्यास हा माझा,
जगावे तर तुझीच होवून,
शेवटची ती असेल ईच्छा
मिठीत रहावे तुझ्या सुखावून


कवी - मनस्वी

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

- संत तुकडोजी महाराज.

लंपट ओले वस्त्र हो‍उनी

लंपट ओले वस्त्र हो‍उनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे

हुळहुळनारे वस्त्र रेशमी
हो‍उनी वर वर घोटाळावे.

भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे

पहाट होता पश्मीन्याची
शाल हो‍उनी तुज छपवावे.

- पु. शि. रेगे