राज ठाकरे : मराठी हृदयसम्राट.
8:34 PM
by Ganesh Thorat

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्याने स्थापन झालेल्या राजकिय पक्षाचे संस्थापक आहेत. तसेच शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षमुद्दा महाराष्ट्र व मराठी केंद्रीत ठेवला आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात वास्तव्यास असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिकांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवरयात राहिले.
वैयक्तिक.
राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. त्यांचे वडिल श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांची बहिण आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले. राज ठाकरे हे त्यांच्या ठाकरे घराण्यातील इतरांप्रमाणे व्यंग चित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्ने साठी कार्टून करणे नक्कीच आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे. शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
राजकिय वाटचाल
शिवसेना

ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी शिवसेनेतच सूरु केली. उमदे प्रभावी व्यक्ती मत्व म्हणून राज ठाकरे यांनी आपला मोठा समर्थकांचा पाठिंबा मिळवला. शिवसेनेतीला तरुणांचा पाठिंबा बळकट करण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सुत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स २००६, मार्च मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेने मध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजा भावाची वागणूक देत असल्याच्या कारणावरुन शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसातच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. आपण कोणत्याही पक्षात सामील होणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती.
महाराष्ट नवनिर्माण सेना.

एप्रिल २००६ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इथून पुढे मनसे संक्षिप्त) या पक्षाची स्थापना केला. मराठी माणसाचे हितरक्षण व उन्नती हा या पक्षाचा प्रमुख मुद्दा आहे. शिवसेना हा पक्षही मराठी मुद्यावर स्थापन झाला होता. परंतु शिवसेनेने ह्या मुद्याला बगल दिली असल्याची पक्षाची भावना आहे. सुरुवातीला शिवसेनेतील राज ठाकरे समर्थक लगेचच या पक्षात सामील झाले तर नवी राजकीय कारकीर्दीस उत्सुक असलेल्या अनेकांनी या पक्षात प्रवेश केला. राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापने पासून प्रभावी भाषणांचा सपाटा लावला. पहिल्या भाषणांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल यावर भर दिला गेला. स्थानिक मराठी तरुणांना नोकर्यांमध्ये प्राधान्य हा त्यातील प्रमुख मुद्दा होता. तसेच महाराष्ट्रातील राजकिय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिचे उन्नतीकरण होईल अश्या प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.
उत्तरप्रदेशी व बिहारी
वरील टिका.राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणार्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई पहिलेच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल,असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोंढ्यावर आपला शाब्दिक हल्ला चढवला. या राज्यातील राजकारण्यांमुळे ही या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात यातील सर्वात जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भरावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टिका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकिय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येउन येथील स्थानिक लोकांच्या नोकर्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येउन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करण्याचा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येउन मराठी शिकत नाहीत त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभवला भाषिक अस्मिता दिली. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत ह्या राज्यात ह्या देशांमध्ये बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत संमिलीत होत नाहीत व उलटे मराठीला हिन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अश्या प्रकारचे अनेक आरोप टिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतीतून स्पष्टपणे व्यक्त केली.
मनसे विरुध समाजवादी पा
र्टी.३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी लिहिलेले भित्तीपत्रे (युपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बंम्बई है|) व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टिकास्त्र सोडले व सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकिर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात अखडता घेतात. फेब्रुवारी १३ २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टिका सहन करावी लागली व कृती म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टी चे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली व उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला. परिणामी अनेक ठिकाणांवरुन उ.प्रदेश व बिहार मधील कामगार आपपल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण् झाला. या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसे ने कामगार भर्ती साठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावी अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली. अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.
अटकसत्र
ऑक्टोबर मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले. या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परिक्षा. पश्चिम रेल्वेच्या परिक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भर्ती परिक्षांसाठी बिहारी परिक्षार्थींचीच का निवड करण्यात् आली तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परिक्षेची सूचना न देण्यास कारण काय? या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबई नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली. लालूप्रसाद व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले. मनसे च्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात् आली. बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून अनेक रेल्वे जाळण्यात आल्या. दिल्लीमधील महाराष्ट्र सदन या कार्यालयावर हल्ला करुन मोड तोड करण्यात् आली. या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ, यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टिका केली. शोभा डे या मान्यवर लेखिकेनी देखील आय.बी.एन या वाहिनीवर डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले. प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकरे व मराठी भाषिकांचे मत ही भूमिका समजून न घेता बायस टिका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे मत होते. ( बिहारमधील रेल्वे जाळणारे त्यांना विद्यार्थी संबोधले व महाराष्ट्रात दंगे करणारे मनसेचे गुंड असे संबोधले गेले).
विधानसभा निव
डणुक २००९.संसदेच्या निवडणुकीमधे मनसेला मराठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लाखभरावरती मते मनसेच्या उमेदवाराना मिळाली. विरोधी पक्षांचे धाबे दणाणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक २००९ मध्ये झाली मनसेचे चक्क १३ आमदार निवडून आले. हा करिश्मा होता राजठाकरेचा व मराठी मतांचा आणि राज ठाकरे हे मराठी हृदयसम्राट झाले।
मुळ लेख मराठी विकिपीडीया मधील
जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात.
डांस इंडिया डांस
7:15 PM
by Ganesh Thorat
सद्या चंनेल्सवरती नाना प्रकारच्या रियालटी मालिकांचा भडिमार आहे, परंतु अशा रियालटी मालिकांमध्ये 'डांस इंडिया डांस ' या मलिकेने आपले स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. टेरेंस की टोली, गीता की गँग आणि रेमो के रंगीले असे तीन भन्नाट ग्रुप, त्यात मिथुनदाचा ग्रैंड सलूट तसेच 'क्या बात', 'क्या बात,’ 'क्या बात’ बोलून मुलांचे मनोबल वाढवणे. टेरेंसचा चुम्मीश्वर परफोमांस, गीताचा fantastic, fabulas finomal परफोमांस अथवा रेमोचा thats called a performance अशा प्रकारचे कमेंट्स करने. त्यामुले हा रियालटी शो भलताच मजेशीर व हिट झाला आहे, आणि का नाही होणार डांसची अनोखी अदाकारी जी कधी आपण पहिली नाही ती पहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात मुलानाही आपली कला जगापुढे दाखवायची संधी मिळाली.
पूर्वी डांस म्हंटले का फक्त एकच शो आठवायचा तो म्हणजे ' बुगी वुगी' आणि आजही तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. परंतु ’डांस इंडिया डांस’ मध्ये एक अनोखे वेगळेपन जपले गेले आहे. जगामधिल सर्व प्रकारचे डांस आपल्याला येथे पाहण्याची संधी मिळाली. ह्या मुलांमध्ये टैलेंट खच्चून भरलेले आहे त्यासाठी त्यानी आणि त्यांच्या गुरुने घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. डांस इंडिया डांस मधील पहिल्या वर्षाला सलमान खान हा विजयी ठरला होता, त्या वेळेच्या तुलनेत बघयला गेले तर आता खुपच जबरदस्त स्पर्धा आहे. कृति, जैक, अमृता, अमर, पुनीत, किशोर, शक्ति आणि धर्मेश एकापेक्षा एक सरस डांसर प्रत्येकाची आपआपली वेगळी शैली आहे आणि त्यात ते माहिर ही आहे. त्यामुळे स्पर्धा कमालीची कठिन झाली आहे. आता जनताच काय तो योग्य निर्णय देइल.
सध्या सगळ्यात जास्त बोलबोला कोणाचा असेल तर तो आहे धर्मेशसर ....त्याचे लटके झटके आणि प्रत्येक बिटवर साधलेला समतोलपना सगळे काही अप्रतिम आणि मजेशीर बात ही आहे का त्या शो मधील सूत्रसंचालन करणारी सुन्दरी चक्क त्याच्या प्रेमात पडली. आता हे खरे आहे की एक स्टंट हा वेगला भाग आहे, परंतु धर्मेशची सध्या तरी क्रेज जबरदस्त वाढली आहे आणि तो लोकांच्या कसोटीवर किती खरा उतरतो ते लवकरच कळेल.
मेघा फायनलला थोडेच दिवस शिल्लक राहिले आहे आणि कोण जिंकतो यंदाचा डांस इंडिया डांसची तक़दीर की टोपी याचाकडे सर्वांच्या नजरा असतील. तर मग चला सर्वाना आपल्या हार्दिक शुभेच्या!!

प्रभो शिवाजीराजा.
7:08 PM
by Ganesh Thorat

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
!!राजा शिवछत्रपती!!
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकवी स्वातंत्र्यवीर सावरकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्याजयंती निमित्त तमाम
महाराष्ट्रातील जनतेचा मानाचा मुजरा !!!
जय भवानी !!! जय शिवाजी !!!जय महाराष्ट्र॥
गणेश थोरात.
प्रेमविवाह अयशस्वी का होतात?
11:43 PM
by Ganesh Thorat
सदर लेख हा माझ्या एका प्रिय मैत्रणीसाठी.....
'मला वाटले नव्हते तू असा/अशी निघेल', हे शब्द आहे एका प्रेमविवाह करनाऱ्या जोड्प्यांचा. हे असे काय अनपेक्षित घडले की एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे प्रेमी लग्न झाल्यानंतर निराश होतात? का नकोसा वाटतो एकमेकांचा सहवास? प्रेमविवाह की ठरवून केलेले लग्न यामध्ये कोण यशस्वी होते. हा एक वाद आहे. असे नाही की प्रेमविवाह हे सगळेच यशस्वी होतात. काही विफल ही होतात. तर चला आपण अवलोकन करुया की का प्रेमविवाह अयशस्वी होतात.
प्रेम करने आणि लग्न यात खुप फरक आहे. लग्न केले की रोज एकत्र रहाणे आलेच. आधी केलेले वादे सदैव पूर्ण होतात असे नाही. लग्नानंतर फिरने, मौजमज्जा करने याला थोड़े बंधन येतात. लग्नापूर्वी कित्येक वर्षे एकमेकांना ओळखणारी जोडपीही लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी एकमेकांच्या स्वभाव, आवडीनिवडींविषयी वाद घालताना दिसतात. अर्थात सगळ्याच वादांचे रूपांतर घटस्फोटात होते असे नाही. प्रेमविवाहात मात्र पहिल्यापासूनच "मी असा आहे' किंवा "मी अशी आहे, हे तुला माहीतच आहे,' अशा प्रकारे सुरवात होते. त्यामुळे जुळवून घेईपर्यंत थोडे जपून राहण्याऐवजी पहिल्यापासूनच चौफेर फलंदाजी सुरू होते.
कुटुंबाचा किंवा त्यातल्या कोणाचातरी त्या लग्नाला ठाम विरोध हा एक खुप मोठा गहन प्रश्न असतो. त्यात जर नवरा बायकोचे वाद झाला की तेल ओतायला यांना कोणी सांगायची गरज नसते. "बघ, तुला आधीच सांगत होतो, नको करूस म्हणून,' असा सूर लावतात. अशा वेळेला कुटुंबाची गरज असतानाही त्यांची मदत मिळत नाही. अर्थात यात महत्त्वाचा ठरतो, तो एकमेकांवरचा विश्वास. आता पहा काही भिन्न आर्थिक, सामाजिक परिस्थिती, वेगवेगळे धर्म, देश असलेली जोडपीदेखील अत्यंत यशस्वीरीत्या संसार करताना दिसतातच ना? या मागे असतो त्यांचा एकमेकांवरिल अतूट विश्वास. प्रेमविवाहात एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात, नाही तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणे म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं आपला हक्कच आहे, अस त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्यांचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो, आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार असतो. ‘मला काय वाटतं, हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही’, ‘असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही’, ‘माझ्या आई-वडिलांविषयी तु असं बोलतेस/बोलतोस?’ अशा उद्गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो. यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहुनही अधिक अपमान कसा करता येईल, याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा किंवा बायको वर्चस्व गाजवणारी असेल तर हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो, आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होतं. म्हणूनच पती-पत्नी एकमेकांना दुखावण्याचं आवर्जून टाळायला हवे आणि समजा, कधी दुखावलं तर आपला ’अहं’ बाजूला सारून जोडीदाराची माफी मागायला हवी.
प्रेमात पडलेल्या व्यक्तिंना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेचं प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघाच्याही भिन्न व्यक्तिमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या व्यक्तिमत्वांची खरी ओळख पटते, आणि मतभेदांना सुरुवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकतं. उदा. जोडप्यामधील एकजण बोलका, मनमिळावू सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा अबोल, दुसऱ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त न करणारा, त्यांच्याबद्द्लचे अपले प्रेम, जिव्हाळा न दाखवणारा असेल तर यामुळे त्या जोडप्यात मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरूध्द उत्साह, विश्वास विरूध्द संशय, अंतर्मुखता विरूध्द बहीर्मुखता वगैरे सारखे स्वभावविशेष विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात. पती-पत्नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशयी किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होतात.थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेऊन जर पती-पत्नींनी आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाहापुर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं.विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील.घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरून जावे लागणार नाही. म्हणूनच लग्नाआधीचे प्रेम असो वा नसो, ते लग्नानंतरही कायम राहिले म्हणजे झाले!

"मधुबाला"
7:29 PM
by Ganesh Thorat
१४ फेब्रुवरी १९३३ रोजी मुमताज जेहान बेगम देहलवीचा जन्म झाला. पश्तून मुस्लिम कुटुंबामधिल ती पाचवी अपत्य एका मुस्लीम मौलविने तीला पाहता क्षणीच म्हंटले की ही अप्सरा सारखी सुंदर आणि खुप नावलौकिक हस्ती बनेल। धनदौलाताची रास तिचाकडे असेल. परन्तु तिचे आयुष्य कमी असेल. ती तरुण वयातच अल्लाला प्यारी होणार हे शव्द ऐकून त्या चिमुकलिचे वडिल अताउल्ला खान याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईला आल्यानंतर त्यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये खुप कष्ट करावे लागले. कालांतराने त्या मुलीला फिल्म इंडस्ट्री मध्ये बालकलाकाराचे काम मिळाले. ती बेबी मुमताज आणि पुढे "मधुबाला" या नावाने सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली.वयाचा ९ व्या वर्षी तिने ''बसंत" (१९४२) मध्ये दमदार अभिनय केला. त्यावेळिची सुपरस्टार देविका रानी तिचावर जाम खुश झाली आणि तिने तिचे नाव मुमताज बदलून मधुबाला ठेवले. पुढे हीच मधुबाला प्रत्येक तरुणांची स्वप्नसुन्दरी बनली.
"ज्वारभाटा" (१९४४) मध्ये तीला प्रमुख भूमिका मिळाली ती दिलीपकुमार संगे काही कारणास्तव त्या चित्रपट ती काम करू शकली नाही पण दिलीप कुमा
रशी तिची ओळख झाली. मधुबालाला सुवर्ण संधी मिळाली ती केदार शर्मा यांच्या "नील कमल" (१९४७) मध्ये राज कपूर बरोबर. तो चित्रपट खुप चालला मग मागे तिने कधी पाहिलेच नाही. अवघ्या दोन वर्षात ती सफल अभिनेत्री बनली. तिने सतरा चित्रपटांमध्ये काम केले. त्यात "मुघल-इ-आजम" हा भयंकर सुपर डुपर हिट झाला त्यातील दिलीप कुमार आणी मधुबाला जोड़ी ही अविस्मरनीय ठरली. दोघांच्या प्रेमाचे चर्चेही सुरु झाले. कदाचित देवाला ते मंजूर नव्हते दिलीप कुमार ने सायरा बानोशी आणी मधुबालाने किशोर कुमारशी लग्न केले.किशोर कुमार बरोबर तिने केलेला "चलती का नाम गाड़ी" चित्रपट जबरदस्त हिट झाला. 'एक लड़की भीगी भागीसी' ह्या
गाण्यामधील तिची अदा लाखो चाहत्यांना सुखावून गेली आणि खरच ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहे. याचा प्रत्यय चित्रपटातील बारीक़ बारीक़ विनोद आणि संवादातुन जाणवत होता परंतु ते सुद्धा देवाला मंजूर नव्हते.रूटीन चेकअप केले असता तीला कळले की तिच्या हृदयाला छिद्र आहे. डॉक्टर म्हणाले की याचावर काही उपचार नाही जरी शस्त्रक्रिया केली तरी ती अवघी एकच वर्ष जगेल. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिचा शेवट झाला. आजही तिची सुंदरता आणि मोहक हसने मनाला भुरळ पाडून जाते. ती सुंदरतेची साक्षात् देवी होती. १४ फेब्रुवरी तिचा जन्मदिवस आणि योगायोगाने त्या दिवशी प्रेमाचा दिवस म्हणून ही साजरा केला जातो. अशा लावण्यवतीला मराठी रसिका कडून भावपूर्ण
आदरांजली !!!
गणेश थोरात.
"दमलेल्या बापाची ही कहाणी "
1:14 AM
by Ganesh Thorat
"अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्याभूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं आणि बघता बघता अगदी लहान मुलांपासून ते वयस्कराना सुद्धा अश्रु आवरता आले नाही. जो तो रडत होता. अप्रतिम असे गीत लिहले ते संदीपने आणि संगीत दिले ते सलिलने मग काय दोघांची गट्टी जमली आणि "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" चा अविष्कार झाला. गाण्याचे शब्द खुपच बोलके होते. एकूनएक ओळ म्हणजे जणू काही आपलीच कहानी सांगत आहे असे सर्व रसिक मायबापना वाटत होते. गीताचे सुरवातीचे बोल ते शेवट इथे कोठेही कमतरता जाणवत नव्हती. मध्येच संदीपने केलेली प्रस्तावना सगळ काही अप्रतिम होत.
जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात
“बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं”.
जेव्हा संदीप हे बोलत होता तेव्हा अगदी मन भरून आले होते. लहान मुलाना जेव्हा दात येणे तसेच तो जेव्हा लुटू-लुटू उभा राहत चालू लागतो. तेव्हा जो आनंद आई वडिलांना होतो तो काही औरच असतो. त्याचे जिवंत वर्णन या ओळीमध्ये स्पष्ट जाणवते. आणि या क्षणाला कोणाला आपल्या मुलांचे बालपन आठवले नाही तर नवल.आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं”.
“असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये”.
हे जे शेवटचे कडवे होते ते इतके सवेंदनशील होते की कोणालाही आपले रडू आवरता आले नाही. जेव्हा बाबा आपल्या छकुलीसाठी सर्व दुख सहन करून ती कशी सुखी राहिल याची धडपड करीत असतो. सदैव ती आनंदात राहो यासाठी त्यांचा जिव तिळतिळ तुटत असतो. भले तिला ते वेळ देऊ शकत नाही पण तिला सर्वकाही मिळावे यासाठी त्यांची प्रयत्नाची पराकाष्टा असते. आणि ती जेव्हा लग्न करून सासुराला निघते त्यावेलेला सर्वात जास्त दुःख हे तिच्या बाबानाच होते. लहानपणापासून तिच्या साठी झगडनारे बाबा आजपासून तिच्या मायेला मुकनार कसे हो शक्य आहे हा विरह सहन करने. आज ही ऑफिस अथवा घरी असताना हे गाणे ऐकले की डोळ्यातून अश्रु आल्याशिवाय राहत नाही. माझ्या गीत संग्रहामधिल हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. अशी सुंदर गीतरचना आणि संगीत दिल्याबद्दल संदीप आणि सलिलला GRAND SALUTE...हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये”.
जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात
!!विट्ठल!!
8:40 PM
by Ganesh Thorat
पंढरपूरच्या वेशीवरती आहे एक शाळा
सगळी मुले गोरी मात्र
एक आहे काळा
दंगा करतो फार, खोड्या काढण्यात अट्टल,
मारायचे कसे, मास्तर म्हणतात,
असायचा विठ्ठल!
मूळ कवी:विंदा
सगळी मुले गोरी मात्र
एक आहे काळा
दंगा करतो फार, खोड्या काढण्यात अट्टल,
मारायचे कसे, मास्तर म्हणतात,
असायचा विठ्ठल!
मूळ कवी:विंदा
वस्त्र
8:36 PM
by Ganesh Thorat
मीच माझा धर्म आणिक
मीच आहे संप्रदाय
मीच प्रेषित, भक्त मी अन
मीच आहे देवराय
क्षुद्र, कोता मी जिवाणू
मी घटोत्कच भीमकाय
कांबळी अन घोंगडी मी
अन कधी मी घट्ट टाय
कृष्ण काळा-सावळा मी
सांब शंकर गौरकाय
इंद्र मी लाचार याचक
वामनाचे मीच पाय
मर्द मी तो सव्यसाची
क्लीब किन्नर मीच नाची
मी युगांची साक्ष साऱ्या
मी खलांच्या लूटमाऱ्या
सोवळा मी, ओवळा मी
पक्व किंवा कोवळा मी
शोधतो गुंत्यात साऱ्या
कोणता आहे खरा मी
यातला मी एक धागा
एकरंगी, एकढंगी
गुंतुनी वा वस्त्र झालो
मर्त्य मानव सप्तरंगी ?
मूळ कवी:मिलिंद
मीच आहे संप्रदाय
मीच प्रेषित, भक्त मी अन
मीच आहे देवराय
क्षुद्र, कोता मी जिवाणू
मी घटोत्कच भीमकाय
कांबळी अन घोंगडी मी
अन कधी मी घट्ट टाय
कृष्ण काळा-सावळा मी
सांब शंकर गौरकाय
इंद्र मी लाचार याचक
वामनाचे मीच पाय
मर्द मी तो सव्यसाची
क्लीब किन्नर मीच नाची
मी युगांची साक्ष साऱ्या
मी खलांच्या लूटमाऱ्या
सोवळा मी, ओवळा मी
पक्व किंवा कोवळा मी
शोधतो गुंत्यात साऱ्या
कोणता आहे खरा मी
यातला मी एक धागा
एकरंगी, एकढंगी
गुंतुनी वा वस्त्र झालो
मर्त्य मानव सप्तरंगी ?
मूळ कवी:मिलिंद
माझे ते चींब रुप ही परत हवय मला
8:33 PM
by Ganesh Thorat
तुझ्या डोळ्यांतून ओघळणारा
एक न एक थेंब हवाय मला
सखे, तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला
भिजलेले माझे ते रुप
गालावरुन ओघळताना
थरथरत असेनही कदाचीत, पण..
सखे, ओठांकडे वळण्या अगोदर
माझे ते चींब रुप ही परत हवय मला
मनात उठलेले काहुर अन
ह्रदयातील अग्नी शमविण्यास
तुझ्या डोळ्यांतून ओघळणारा
एक न एक थेंब हवाय मला
सखे, तुझ्याकडे असणारा माझा
एक न एक कण हवाय मला
तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला
मूळ कवी:गणेशा
एक न एक थेंब हवाय मला
सखे, तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला
भिजलेले माझे ते रुप
गालावरुन ओघळताना
थरथरत असेनही कदाचीत, पण..
सखे, ओठांकडे वळण्या अगोदर
माझे ते चींब रुप ही परत हवय मला
मनात उठलेले काहुर अन
ह्रदयातील अग्नी शमविण्यास
तुझ्या डोळ्यांतून ओघळणारा
एक न एक थेंब हवाय मला
सखे, तुझ्याकडे असणारा माझा
एक न एक कण हवाय मला
तुकड्या तुक्ड्यातका होईना
माझे अक्स परत हवय मला
मूळ कवी:गणेशा
हे असे का व्हावे?
8:32 PM
by Ganesh Thorat
एक नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी
अन् पाऊस पडूच नये
नुसतच आभाळ भरुन राहव
आणि मधूनच वीज चमकत राहावी
तशीच आठवन येऊन जाते
वेळ कातर होत राहते
जखम जुनीच असते
नुकतीच कुठे खपली धरु लागलेली
पुन्हा नव्याने भळभळू लागते
चुक कोणाची असते
किंवा असते की नसते
ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो
अन् हे सगळ आठवून
हताशपणे बघण्यापलिकडे
काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.....
मूळ कवी:तुष
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी
अन् पाऊस पडूच नये
नुसतच आभाळ भरुन राहव
आणि मधूनच वीज चमकत राहावी
तशीच आठवन येऊन जाते
वेळ कातर होत राहते
जखम जुनीच असते
नुकतीच कुठे खपली धरु लागलेली
पुन्हा नव्याने भळभळू लागते
चुक कोणाची असते
किंवा असते की नसते
ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो
अन् हे सगळ आठवून
हताशपणे बघण्यापलिकडे
काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.....
मूळ कवी:तुष
लोकांचा सभ्यपणा........
8:28 PM
by Ganesh Thorat
लोकांचा सभ्यपणा........
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे कित्येक असतात,
वासनेला प्रेमाचे नाव देवुन पैशाला सर्वच भाळतात,
खोटी स्वप्न दाखवुन जे ह्र्दयाशी खेळतात,
गरज असेपर्यत आपलं म्हणतात,
त्यांनाच लोक सभ्य म्हणतात......
मूळ कवी:अनामीक

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
8:15 PM
by Ganesh Thorat
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी
कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावेपण,
पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे
कविकार.
श्री.सुरेश आंधळे

अजय अतुल एक भन्नाट जोड़ी.
7:41 PM
by Ganesh Thorat
“श्वास”, “दे धक्का”, “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “नटरंग”, “झेंडा”, “शिक्षणाच्या आयचा घो” आणि “हरीशचंद्राची फैक्ट्री” असे एका मागोमाग आलेले भन्नाट चित्रपट की ज्याने अगदी हिंदी चित्रपटांची तारांबळ उडवली. एकापेक्षा एक सरस चित्रपट. हाउसफुल!! तोबा गर्दी!! मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये लावायचे म्हंटले तरी मल्टीप्लेक्स मालकांना त्रास होत असे. शोची भलतीच वेळ असायची कधी सकाळी तर कधी आड़वेळी असा प्रकार चालायचा. परंतु आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. हिंदी सिनेमा पेक्षा मराठी चित्रपट गर्दी खेचत आहे. मालक ही खुश झाले आहे. आणि या सफलतेमध्ये वाघाचा वाटा आहे तो एका भन्नाट जोडीचा, संगीतकार " अजय-अतुल".
अप्रतिम संगीतकार आहेत ते दोघे त्यांना मराठी चित्रपट हा सातासमुद्रापार जावा अशी मनापासून कामना आहे, नाहीतर तसा त्यांनी विडाच उचलला आहे. आणि तो नक्कीच पूर्ण होणार यात किंचितही शंका नाही ." मोरया मोरया", "अप्सरा आली" अशी कितीतरी जबरदस्त हिट गाणी त्यानी दिली आहे. पुण्यामध्ये त्यांचा कार्यक्रम असताना श्री राजसाहेब त्यांच्या अग्रहाखातर उपस्थित होते,"ह्या दोघाना काळा टिका लावा त्यांना कोणाची नजर नाही लागली पाहिजे" असे राजसाहेब त्यांच्या आई वडीलाना म्हणाले होते. काही दिवसापूर्वीच या भन्नाट जोडीच्या वेबसाईटचे उदघाटन श्रीमान अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले। आज प्रत्येकाच्या ओठावर त्यांचीच गाणी गुनगुनत आहे त्यांच्या मते हे दोन अमूल्य कोहिनूर हीरे आपल्या मराठी चित्रपटसुष्टिला मिळाले आहे । हे कोहिनूर हीरे असेच चमकत राहो आणि त्यांचा प्रकाश पूर्ण जगामध्ये पसरु दे हीच शुभेछ्या आम्हा सर्व महाराष्ट्राकडून....
जय महाराष्ट्रा!!!

मुंबई कोणाची?...आणि राजसाहेब.
9:50 PM
by Ganesh Thorat
मुंबई कोणाची? मुंबई कोणाची?? मुंबई कोणाची??? जिकडे बघावे तिकडे हीच बोंब...काही समजत नाही की राजकीयपुढारी सोबत काही सिने कलाकार आणि उधोगपति ह्या भानगडित का पडत आहे. राजकीय नेत्यांचा स्टंट तर आपण समजू शकतो, परंतु सिने कलाकार आणि उधोगपति कशाला हा उठाठेव करत आहे. प्रत्येक जण स्वतंत्र आपले विचार मांडू शकतो तसा तो घटनेने दिलेला अधिकारच आहे, मग पुढे जावून घुमजाव कशाला करायचे का, ते सुद्धा काही स्टंट तर करत नाही ना? ज्याला त्याला उत्तर भारतीयांचा पुळका आला आहे. मुंबई मधील त्यांची वाढलेली लोकसंख्या पाहता नविन मतदार संघ निर्माण करायचे आणि हळूच मराठीच्या नाका खालून मुंबई वर राज्य करायचे हा खुप जुना आणि चतुर डाव आहे, आणि त्याला कळत नकळत आपले काही राजकीय पुढारी आणि जनता सुद्धा मदत करत आहे, आणि हे आपल्याला किती घातक आहे याची कोणाला (मराठी जनता) तिळमात्र ही शंका नाही.
जो मुंबई मध्ये जन्मजात आणि वर्षंन वर्ष राहून कर भरत आहे तो मुंबई कर आहे, ज्याला मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे तो खरा स्थानिक ह्या राज साहेबांच्या विधानाचा पूर्णता विपर्यास लावला गेला. अनेक चुकीचे अर्थ काढले गेले. म्हणा त्याचा त्यांना काहीही फरक पडणार नाही परंतु काही हिंदी पत्रकार आणि इलेक्ट्रोनिक मिडियाने राजसाहेबाना अगदी देशद्रोही म्हंटले आहे. निदान त्याना देशद्रोहिचा अर्थ निट समजला नसेन अथवा माहित असुनही फक्त आपल्या लोकाना कसे वाचवायचे हाच त्यांचा प्रयत्न होता, आणि तो त्यानी चांगल्या प्रकारे पार पाडला त्यामुलेच तर उत्तर भारतीय नेते झोपेतून ताडकन जागे झाले, नाही तर ते जागे आहे की झोपलेले ते कधी समजतच नाही पण आयत्या वर कोयता प्रमाणे काहीतरी उपद्रव करायला भेटला तर मग काय जन जागृति करणारी विधाने केली हे करताना ते हे विसरले की याचा त्रास मुंबईतिल स्थानिक उत्तर भारतीयांना होऊ शकतो पण छे! हो! असा विचार करणारे ते नेते कसले त्याना फक्त हा विषय कसा पेटत राहिल ह्याची चिंता, मग त्याना सडेतोड उत्तर देणार नाही ते राजसाहेब कसले मग पुढे काय घडले ते तुम्हाला माहितच आहे.
प्रत्येक प्रांतात तेथील भूमिपुत्राना प्राधान्य मिळालेच पाहिजे आणि तो त्यांचा जन्मजात अधिकाराच आहे हे घटनेत लिहले आहे. ते काय नविन सांगायची गरज नाही. आणि कोणीही कुठेही जाऊंन राहू शकतो ते ही सत्य आहे पण ते होत असताना तेथील स्थानिक भूमिपुत्राना त्रास होणार नाही याची काळजी घेणे जरुरी. आहे पण तसे न करता स्थानिक भूमिपुत्रानाच अरेरावी करने कशी कोण सहन करणार कधी ना कधी याचा उद्रेक होणारच होता आणि त्याला जागा करून दिली ती राजसाहेबांनी आणि त्यामुलेच लोकसभा आणि विधानसभामध्ये त्यांना मराठीच नाही तर इतर समाजनेही भरभरून मतदान करत १३ आमदार निवडून आणले. त्यांचावर टिका ही भरपूर झाल्या की हे सगले मतांचे राजकारण आहे, मराठी मतांचे विभाजन करण्यासाठीचा स्टंट आहे .पण मराठी माणसाला त्याचे काय हो त्याना जो त्रास होता त्याचावरती तोडगा निघाला मराठ्यांना वाली मिळाला. मग त्यासाठी कोणतीही पद्धत का वापरली असेना. आता हेच म्हणावे लागेल की कोणीतरी आपल्या पाठीशी ठाम उभा आहे. आणि मुंबई मराठ्यांचिच आहे हे छाती ठोकपने सांगत आहे. सर्व मराठी जनता त्यांचाकड़े आशेने पाहत आहे आणि लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये हीच आई भवानीच्या चरणी साकडे….

फलक नगरी - मुंबई
8:09 PM
by Ganesh Thorat
" दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या", "नांनाचे संघटन अधक्ष्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन", साहेबांच्या हस्ते भूमिपूजन" अशी फलक तुम्ही रोज जाता येता नाक्या नाक्यावर पहात असणार किती बरे वाटते ना की ही आपली सुंदर मुंबई ह्या फलाकांमुले किती गोजिरवाणी दिसते ना?
हल्ली राजकारणाचे महत्व हे शिक्षणा पेक्षा जास्त आहे शिक्षण पूर्ण करने आणि त्याचानंतर नोकरी शोधने अशी तारेवरची कसरत करावी लागते परन्तु राजकारणी बनायला कशाची म्हणजे कशाचीही गरज लागत नाही एकतर खानदानी वारचा हक्क अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नाहीतर गडगंज संपत्ती आणि ज्यांचाकडे हे सर्व नाही ते कार्यकर्ते अशाप्रकारे हे सर्व काही ठरल्याप्रमाणे असते. मग काय एकमेकांचा उदोउदो करण्यासाठी ही सगळी पोस्टरबाजी आणि त्यात त्रास होतो तो आपल्या मुंबईच्या सुंदरतेला। पण ह्या दादा, भाई आणि साहेबांना त्याचे काय हो...........म्हणतात ना अपना काम बनता ......... मैं जाये जनता.

Subscribe to:
Posts (Atom)