मुंबई कोणाची?...आणि राजसाहेब.
मुंबई कोणाची? मुंबई कोणाची?? मुंबई कोणाची??? जिकडे बघावे तिकडे हीच बोंब...काही समजत नाही की राजकीयपुढारी सोबत काही सिने कलाकार आणि उधोगपति ह्या भानगडित का पडत आहे. राजकीय नेत्यांचा स्टंट तर आपण समजू शकतो, परंतु सिने कलाकार आणि उधोगपति कशाला हा उठाठेव करत आहे. प्रत्येक जण स्वतंत्र आपले विचार मांडू शकतो तसा तो घटनेने दिलेला अधिकारच आहे, मग पुढे जावून घुमजाव कशाला करायचे का, ते सुद्धा काही स्टंट तर करत नाही ना? ज्याला त्याला उत्तर भारतीयांचा पुळका आला आहे. मुंबई मधील त्यांची वाढलेली लोकसंख्या पाहता नविन मतदार संघ निर्माण करायचे आणि हळूच मराठीच्या नाका खालून मुंबई वर राज्य करायचे हा खुप जुना आणि चतुर डाव आहे, आणि त्याला कळत नकळत आपले काही राजकीय पुढारी आणि जनता सुद्धा मदत करत आहे, आणि हे आपल्याला किती घातक आहे याची कोणाला (मराठी जनता) तिळमात्र ही शंका नाही.
जो मुंबई मध्ये जन्मजात आणि वर्षंन वर्ष राहून कर भरत आहे तो मुंबई कर आहे, ज्याला मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे तो खरा स्थानिक ह्या राज साहेबांच्या विधानाचा पूर्णता विपर्यास लावला गेला. अनेक चुकीचे अर्थ काढले गेले. म्हणा त्याचा त्यांना काहीही फरक पडणार नाही परंतु काही हिंदी पत्रकार आणि इलेक्ट्रोनिक मिडियाने राजसाहेबाना अगदी देशद्रोही म्हंटले आहे. निदान त्याना देशद्रोहिचा अर्थ निट समजला नसेन अथवा माहित असुनही फक्त आपल्या लोकाना कसे वाचवायचे हाच त्यांचा प्रयत्न होता, आणि तो त्यानी चांगल्या प्रकारे पार पाडला त्यामुलेच तर उत्तर भारतीय नेते झोपेतून ताडकन जागे झाले, नाही तर ते जागे आहे की झोपलेले ते कधी समजतच नाही पण आयत्या वर कोयता प्रमाणे काहीतरी उपद्रव करायला भेटला तर मग काय जन जागृति करणारी विधाने केली हे करताना ते हे विसरले की याचा त्रास मुंबईतिल स्थानिक उत्तर भारतीयांना होऊ शकतो पण छे! हो! असा विचार करणारे ते नेते कसले त्याना फक्त हा विषय कसा पेटत राहिल ह्याची चिंता, मग त्याना सडेतोड उत्तर देणार नाही ते राजसाहेब कसले मग पुढे काय घडले ते तुम्हाला माहितच आहे.
प्रत्येक प्रांतात तेथील भूमिपुत्राना प्राधान्य मिळालेच पाहिजे आणि तो त्यांचा जन्मजात अधिकाराच आहे हे घटनेत लिहले आहे. ते काय नविन सांगायची गरज नाही. आणि कोणीही कुठेही जाऊंन राहू शकतो ते ही सत्य आहे पण ते होत असताना तेथील स्थानिक भूमिपुत्राना त्रास होणार नाही याची काळजी घेणे जरुरी. आहे पण तसे न करता स्थानिक भूमिपुत्रानाच अरेरावी करने कशी कोण सहन करणार कधी ना कधी याचा उद्रेक होणारच होता आणि त्याला जागा करून दिली ती राजसाहेबांनी आणि त्यामुलेच लोकसभा आणि विधानसभामध्ये त्यांना मराठीच नाही तर इतर समाजनेही भरभरून मतदान करत १३ आमदार निवडून आणले. त्यांचावर टिका ही भरपूर झाल्या की हे सगले मतांचे राजकारण आहे, मराठी मतांचे विभाजन करण्यासाठीचा स्टंट आहे .पण मराठी माणसाला त्याचे काय हो त्याना जो त्रास होता त्याचावरती तोडगा निघाला मराठ्यांना वाली मिळाला. मग त्यासाठी कोणतीही पद्धत का वापरली असेना. आता हेच म्हणावे लागेल की कोणीतरी आपल्या पाठीशी ठाम उभा आहे. आणि मुंबई मराठ्यांचिच आहे हे छाती ठोकपने सांगत आहे. सर्व मराठी जनता त्यांचाकड़े आशेने पाहत आहे आणि लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये हीच आई भवानीच्या चरणी साकडे….
जय महाराष्ट्र!!!
गणेश थोरात.

हे सर्व ठीक आहे . पण ज्य़ा वेळी 'शिवसेना' आवाज उठावते त्यावेळी MNS शांत राहते आणि ज्यावेळी MNS आन्दोलन करते तय वेळेला सेना गप्प राहते ...ह्या सर्वान्मुले मराठी माणसाचा नुकसान होत नहीं का ??
हो होतो ना, पण कोणते आंदोलन आपल्याला योग्य आहे आणि कोणते अयोग्य हे प्रत्येकाने ठरवायचे असतात. ते जर आपल्याला पटत असेल तरच आंदोलनात भाग घ्यावा. असे माझे मत आहे.