"दमलेल्या बापाची ही कहाणी "

"अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्याभूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं आणि बघता बघता अगदी लहान मुलांपासून ते वयस्कराना सुद्धा अश्रु आवरता आले नाही. जो तो रडत होता. अप्रतिम असे गीत लिहले ते संदीपने आणि संगीत दिले ते सलिलने मग काय दोघांची गट्टी जमली आणि "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" चा अविष्कार झाला. गाण्याचे शब्द खुपच बोलके होते. एकूनएक ओळ म्हणजे जणू काही आपलीच कहानी सांगत आहे असे सर्व रसिक मायबापना वाटत होते. गीताचे सुरवातीचे बोल ते शेवट इथे कोठेही कमतरता जाणवत नव्हती. मध्येच संदीपने केलेली प्रस्तावना सगळ काही अप्रतिम होत.
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं”.
जेव्हा संदीप हे बोलत होता तेव्हा अगदी मन भरून आले होते. लहान मुलाना जेव्हा दात येणे तसेच तो जेव्हा लुटू-लुटू उभा राहत चालू लागतो. तेव्हा जो आनंद आई वडिलांना होतो तो काही औरच असतो. त्याचे जिवंत वर्णन या ओळीमध्ये स्पष्ट जाणवते. आणि या क्षणाला कोणाला आपल्या मुलांचे बालपन आठवले नाही तर नवल.
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये”.
हे जे शेवटचे कडवे होते ते इतके सवेंदनशील होते की कोणालाही आपले रडू आवरता आले नाही. जेव्हा बाबा आपल्या छकुलीसाठी सर्व दुख सहन करून ती कशी सुखी राहिल याची धडपड करीत असतो. सदैव ती आनंदात राहो यासाठी त्यांचा जिव तिळतिळ तुटत असतो. भले तिला ते वेळ देऊ शकत नाही पण तिला सर्वकाही मिळावे यासाठी त्यांची प्रयत्नाची पराकाष्टा असते. आणि ती जेव्हा लग्न करून सासुराला निघते त्यावेलेला सर्वात जास्त दुःख हे तिच्या बाबानाच होते. लहानपणापासून तिच्या साठी झगडनारे बाबा आजपासून तिच्या मायेला मुकनार कसे हो शक्य आहे हा विरह सहन करने. आज ही ऑफिस अथवा घरी असताना हे गाणे ऐकले की डोळ्यातून अश्रु आल्याशिवाय राहत नाही. माझ्या गीत संग्रहामधिल हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. अशी सुंदर गीतरचना आणि संगीत दिल्याबद्दल संदीप आणि सलिलला GRAND SALUTE...


जय महाराष्ट्र!!!

गणेश थोरात
0 Responses