डांस इंडिया डांस

सद्या चंनेल्सवरती नाना प्रकारच्या रियालटी मालिकांचा भडिमार आहे, परंतु अशा रियालटी मालिकांमध्ये 'डांस इंडिया डांस ' या मलिकेने आपले स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. टेरेंस की टोली, गीता की गँग आणि रेमो के रंगीले असे तीन भन्नाट ग्रुप, त्यात मिथुनदाचा ग्रैंड सलूट तसेच 'क्या बात', 'क्या बात,’ 'क्या बात’ बोलून मुलांचे मनोबल वाढवणे. टेरेंसचा चुम्मीश्वर परफोमांस, गीताचा fantastic, fabulas finomal परफोमांस अथवा रेमोचा thats called a performance अशा प्रकारचे कमेंट्स करने. त्यामुले हा रियालटी शो भलताच मजेशीर व हिट झाला आहे, आणि का नाही होणार डांसची अनोखी अदाकारी जी कधी आपण पहिली नाही ती पहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात मुलानाही आपली कला जगापुढे दाखवायची संधी मिळाली.
पूर्वी डांस म्हंटले का फक्त एकच शो आठवायचा तो म्हणजे ' बुगी वुगी' आणि आजही तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. परंतु ’डांस इंडिया डांस’ मध्ये एक अनोखे वेगळेपन जपले गेले आहे. जगामधिल सर्व प्रकारचे डांस आपल्याला येथे पाहण्याची संधी मिळाली. ह्या मुलांमध्ये टैलेंट खच्चून भरलेले आहे त्यासाठी त्यानी आणि त्यांच्या गुरुने घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. डांस इंडिया डांस मधील पहिल्या वर्षाला सलमान खान हा विजयी ठरला होता, त्या वेळेच्या तुलनेत बघयला गेले तर आता खुपच जबरदस्त स्पर्धा आहे. कृति, जैक, अमृता, अमर, पुनीत, किशोर, शक्ति आणि धर्मेश एकापेक्षा एक सरस डांसर प्रत्येकाची आपआपली वेगळी शैली आहे आणि त्यात ते माहिर ही आहे. त्यामुळे स्पर्धा कमालीची कठिन झाली आहे. आता जनताच काय तो योग्य निर्णय देइल.
सध्या सगळ्यात जास्त बोलबोला कोणाचा असेल तर तो आहे धर्मेशसर ....त्याचे लटके झटके आणि प्रत्येक बिटवर साधलेला समतोलपना सगळे काही अप्रतिम आणि मजेशीर बात ही आहे का त्या शो मधील सूत्रसंचालन करणारी सुन्दरी चक्क त्याच्या प्रेमात पडली. आता हे खरे आहे की एक स्टंट हा वेगला भाग आहे, परंतु धर्मेशची सध्या तरी क्रेज जबरदस्त वाढली आहे आणि तो लोकांच्या कसोटीवर किती खरा उतरतो ते लवकरच कळे.
मेघा फायनलला थोडेच दिवस शिल्लक राहिले आहे आणि कोण जिंकतो यंदाचा डांस इंडिया डांसची तक़दीर की टोपी याचाकडे सर्वांच्या नजरा असतील. तर मग चला सर्वाना आपल्या हार्दिक शुभेच्या!!


गणेश थोरात.
0 Responses